मनसे कडून वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ मेघा शिंदे यांचा सत्कार

मनसे कडून वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ मेघा शिंदे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) लातूर जिल्ह्यातील भूजल वाढीसाठी अटल योजना युद्धस्तरावर काम पूर्ण करत असून आता तेथे श्रीमती डॉ. मेघा एस.शिंदे यांची वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षक म्हणून नवनियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीच्या डॉ शिंदे ह्या तज्ञ असून त्या जिओलॉजिस्ट असल्याकारणाने लातूर जिल्हा हा या योजने अंतर्गत सुजलाम सुफलाम होईल अशी आशा व्यक्त करत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी त्यांचा सत्कार केला.अहमदपूर चाकूर या विभागात अटल योजने अंतर्गत जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी डॉ शिंदे यांनी बारकाईने या योजनेची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.डॉ शिंदे यांनीही आपण सर्व जनप्रतिनिधींनी सहकार्य केले तर लातूर जिल्ह्यात एक नंबरचे काम करू असे उद्गार काढले.

About The Author

error: Content is protected !!