शास्त्री शाळेत कै.नाना पालकर जयंती साजरी

शास्त्री शाळेत कै.नाना पालकर जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात कै.नाना पालकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळाराम बानापुरे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाळाराम बानापुरे यांनी कै.नाना पालकर यांचा जीवनपट व संघवाढीसाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ज्या संघटनेमध्ये प्रामाणिकपणा,आपुलकी, निस्वार्थ भाव नसतो.ती कधीच मोठी होत नाही.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्तीपेक्षा भगव्या ध्वजाला महत्त्व आहे.आज देशात व परदेशातही हिंदूत्वासाठी व राष्ट्रासाठी फार मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे.नानांनी आपले संपूर्ण जीवन संघासाठी वाहून घेतले.ते एक हुशार विद्यार्थी होते.कवी होते.त्यांनी लिहिलेले उठावणीचे श्लोक आजही आपल्याला प्रेरणा व उर्जा देतात.प.पू.डॉ.हेडगेवार व प.पू.गोळवलकर गुरुजींचे चरित्र त्यांनीच लिहिले.त्यांच्या स्मरणार्थ आपल्या संस्थेने नांदेड येथे कै.नाना पालकर प्राथमिक विद्यालय,ही शाळा चालू केली आहे.हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे,तरच आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र होईल.नानांकडून आपण प्रेरणा घेऊन एकत्र यावे व देशसेवेसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा.असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी कार्य केलेल्या कै.नाना पालकर यांचे साहित्य उपलब्ध करून वाचावे व आपणही त्यांच्यासारखे काही कार्य करु शकतो का?याचा विचार करावा.ज्या ज्या वेळी देशावर काही संकट आले तर,आपण एकत्रितपणे त्या संकटाचा सामना केला पाहिजे.एकतेचे महत्त्व सांगितले. सुत्रसंचलन सौ.दिपाली भावसारबाईंनी केले तर,आभार सौ.मंजुषा पेन्सलवारबाईंनी मानले.

About The Author