समर्थ विद्यालयात विशाखा समितीचे शिक्षण उपनिरीक्षक बालवाड यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी विशाखा समितीचे उद्घाटन लातूर येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण उपनिरीक्षक एल. डी. बालवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून शिक्षण उपनिरीक्षक एल. डी. बालवाड उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसूरे, रसूल पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना बालवाड म्हणाले की, शासनाने कार्यरत असलेल्या ठिकाणी महिला व विद्यार्थींनीच्या अडचणी समजून घेऊन त्या निवारण करण्यासाठी महिला शिक्षिकेच्या माध्यमातून विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. तेंव्हा मुलींनी न घाबरता आपल्या समस्या व अडचणी सांगत त्या सोडवल्या पाहिजे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी मुलींनी खंबीर होत आलेल्या वाईट प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. त्यासाठी ही विशाखा समिती कायम तुमच्या सोबत राहून सहकार्य करेल असे सांगितले. प्रास्ताविक रसूल पठाण यांनी केले. सुत्रसंचलन विद्यार्थीनी सरस्वती निळकंठ शेवाळे तर आभार माया सुनिल जाधव हिने मानले. यासाठी समन्वयक अमर जाधव, शिक्षिका स्वाती मठपती याच्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.