तहसील कार्यालयातील मोठमोठ्या वृक्षांची कत्तल, कठोर कारवाईची मागणी

तहसील कार्यालयातील मोठमोठ्या वृक्षांची कत्तल, कठोर कारवाईची मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील प्रशासकीय इमारतीला कोट्यावधीचा निधी देऊन इमारतींची उभारणी होत आहे. एका बाजूला हे सिमेंटचे जंगल उभा राहत असतानाच, ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब जनतेला शासकीय काम होईपर्यंत उन्हातानात थांबावे लागू नये, अशा उदात्त हेतूने तत्कालीन अधिकाऱ्यांनी तहसील, पंचायत समिती आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाडे लावली होती.

तहसील कार्यालयातील मोठमोठ्या वृक्षांची कत्तल, कठोर कारवाईची मागणी

कित्येक वर्षांपूर्वीची झाडे आता मोठी झाली होती. पावसा पाण्याच्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना आसरा देणारी ही झाडे कोणाचे काहीही नुकसान करत नसताना देखील, किरकोळ आर्थिक फायद्यासाठी काही समाजकंटकांनी ती झाडे तोडली आहेत. अशा पद्धतीने खुलेआम प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील वृक्षतोड करणाऱ्या नराधमाला शासन, प्रशासनातील कोण पाठीशी घालत आहे? कुणाच्या आशीर्वादाने अशी मस्तवाल प्रवृत्ती वाढीस लागली आहे? अशा पद्धतीची प्रतिक्रिया संतप्त झालेल्या नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता वृक्ष लागवड करून शाश्वत विकासाची संकल्पना सांगितली जात असतानाच, सिमेंटची जंगले उभारून मोठमोठी झाडे तोडणारी मंडळी कोण आहेत? त्याचा शोध लावून संबंधितावर कारवाई केली जावी, अशीही मागणी होत आहे.

About The Author