अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी १५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी : आ.बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे ) चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून १५ कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अहमदपूर नगर परिषदेकरिता ५ कोटी रुपये तसेच चाकूर नगरपंचायत करिता ५ कोटी रुपये अशा एकूण १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंजूर निधीतून सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक, सभागृह बांधकाम व सुशोभीकरण असे विविध विकास कामे होणार आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना व वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.