ग्रंथाने माणसाचे जीवन सुसंस्कारीत बनते – प्राचार्य गजानन शिंदे यांचे प्रतिपादन

ग्रंथाने माणसाचे जीवन सुसंस्कारीत बनते - प्राचार्य गजानन शिंदे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : या देशातील सर्व ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे, या विश्वातील सर्व विद्ववान ग्रंथाच्या वाचनाने व श्रवणाने घडलेअसून ग्रंथ हाच माणसाचा खरा मित्र आहे. म्हणून विद्यार्था सह समाजातील सर्व घटकांनी ग्रंथाशी पहिल्या पसंतीची मैत्री करून आपले जीवन सुसंस्कारित करावे असे आग्रही प्रतिपादन प्राचार्य गजानन शिंदे यांनी केले.ते दि. 24 रोजी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ग्रंथ मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, परवेक्षक अशोक पेद्येवाड, निर्मलाताई पंचगले, प्रमुख मार्गदर्शक मराठी विभाग प्रमुख राम तत्तापूरे ,स्वामी विवेकानंद ज्ञान रथाचे प्रमुख एस बी जोशी ,सचिन खानापुरे, शरद पाटील हे होते. यावेळी श्रीराम तत्तापूरे यानी आपल्या शरीराला अण्णा इतकीच वाचनाची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी दिवसा मागे काही तरी वाचन चिंतन करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस बी जोशी यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार महादेव खळूरे यांनी मांनले. दिवसभर मुलांनी या ज्ञान भांडाराचा लाभ घेऊन संस्कारक्षम पुस्तके आपल्या परिवाराच्या वाचनासाठी विकत घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author