मराठवाड्याला स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदान, त्याग आणि शौर्यातून प्राप्त झाले – प्रा.द.मा.माने यांचे प्रतिपादन

मराठवाड्याला स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदान, त्याग आणि शौर्यातून प्राप्त झाले - प्रा.द.मा.माने यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, मात्र त्यानंतर एक वर्ष एक महिना दोन दिवस अधिकचा लढा देत हैदराबाद संस्थान संपविले, आणि या संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन प्रा.द.मा.माने यांनी केले. ते दि.26 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमत्त माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद,लातूर च्या वतीने “शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रमाची” या विषयावर व्याख्यान देताना ते संत ज्ञानेश्वर विद्यालयात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामातील बिनीच्या शिलेदाराच्या त्यागातून, श्रमातून, मराठवाडा निजामाच्या साम्राज्यातून मुक्त झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे विषय तज्ञ ज्ञानोबा सुक्रे, उध्दव शृंगारे,मुख्याध्यापक आशा रोडगे, मीना तोवर सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घटक चाचणीतील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्या रेखाताई तरडे यांच्या भाषणाने झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीना तोवर यांनी, सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी तर आभार आशा रोडगे-तत्तापुरे यांनी मानले.

About The Author