बायोमॅट्रिक व अॅथेंटेशन वेळेत पुर्ण करुन घेण्याचे गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे यांचे आवाहन
अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हा परिषद लातूर व शिक्षण विभाग पंचायत समिती अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंत ज्यु. कॉलेज, अहमदपूर येथे अल्पसंख्यांक शिष्यवर्ती व बेगम हजरत महल शिष्यवर्तीच्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रिक व अॅथेंटेशन करण्यात आल असुन तालुक्यातील बायोमॅट्रिक व अॅथेंटेशन वेळेत पुर्ण करुन घेण्याचे गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे यांनी आवाहन केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षणाधिकारी माध्यमिक योजना कार्यालय, लातूर व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदपूर येथील यशवंत ज्यु. कॉलेज येथे विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रिक करण्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य शिंदे जी. आर. यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे अल्पसंख्यांक व बेगम हजरत महल शिष्यवर्ती विभागाचे प्रमुख डी. बी. सुकरे, उपप्राचार्य प्रा. सय्यद एम. यू., प्रा.डॉ.बालाजी कारामुंगीकर, सी.एस.सी. सेंटरचे प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, नोडल अधिकारी मालवदे, विक्रम सय्यद आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणुन उपप्राचार्य प्रा. सय्यद एम. यू. यांच्या पुढाकारातुन यशवंत ज्यु. कॉलेजमध्ये सी.एस.जी. सेंटरच्या वतीने विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक करण्यात आले.
यावेळी यशवंत ज्यु. कॉलेज, अहमदपूर येथील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे वरील दोन्ही शिष्यवर्तीचे बायोमॅट्रिक व अॅथेंटेंशन करण्यात आले. सदरील या योजनेचे अहमदपूर तालुक्यातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक करण्यात काम चालु आहे. सदरील पात्र विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी पोर्टलवर केलेली आहे. त्याच विद्यार्थ्यांचे चालु शैक्षणिक वर्षासाठी बायोमॅट्रिक अॅथेंटेशन करण्याचे काम सुरु आहे. तरी तालुक्यातील सर्व शाळांनी आपणास नियोजकाकडुन दिलेल्या वेळेनुसार दोन्ही प्रकारच्या शिष्यवर्तीसाठी पात्र लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक व अॅथेंटेशन वेळेत पुर्ण करुन घ्यावे असे आवाहन गट शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे यांनी केले आहे.
यावेळी विज्ञान प्रमुख प्रा. पुणे आर. जी., कला विभाग प्रमुख प्रा. चिद्रे शिवशंकर, प्रा. दिनेश तोंडारे, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. रवि इरफळे, प्रा. विश्वंभर स्वामी, प्रा. अनमोल पटवारी, प्रा. सतिष ननीर, प्रा. नंदकुमार क्षिरसागर, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. श्रीशैल्य मलशेट्टे, प्रा. राहुल देशमुख, प्रा. चिवडे निळकंट, प्रा. बोधने मॅडम, युवराज पाटील, मोहन कांबळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी केले. संचलन प्रा. शिवशंकर पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. रवि इरफळे यांनी केले.