आ. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते ९२ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व शुभारंभ!
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील टाकळगाव (का) येथील ९२ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन युवराज घोगरे व टाकळगाव ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार केला.
यामध्ये अल्पसंख्यांक कब्रस्तान १० लक्ष रु., स्वच्छ भारत मिशन १० लक्ष रु, मूलभूत सिमेंट रस्ता १० लक्ष रु, जन सुविधा पेवर ब्लॉक १० लक्ष रु, वित्त आयोग पाईपलाईन ५ लक्ष रु, सिमेंट रस्ता १० लक्ष रु, शाळा ५ लक्ष रु, 9505 सिमेंट रस्ता १० लक्ष रु, 9505 पेवर ब्लॉक २० लक्ष रु, वित्त आयोग पूल बांधकाम २.५० लक्ष रु. अशा एकूण ९२ लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य बापुदेव महाराज बेलगावकर, अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मंचकराव पाटील, गुरुवर्य ह.भ.प. नागनाथ महाराज राडकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी जि.प. सदस्य माधवराव जाधव, शहराध्यक्ष अजहर बागवान, माजी उपसभापती तुकाराम पाटील, मा. चेअरमन दीपकराव जाधव, राजकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष दयानंद पाटील, माजी चेअरमन बालाजी रोकडे, संचालक सतीश नवटक्के, सावरगाव रोकडा सरपंच अशोक कोटंबे, उपसरपंच प्रतापराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष सुंदर साखरे, सरपंच हिप्परगा कोपदेव निळकंठ गोरटे, धानोरा उपसरपंच अमोल जाधव, नागठाणा सरपंच दौलतराव माकणे, ग्रा. सदस्य किनगाव धनराज बोडके, गोताळा सरपंच गोमाजी कोदळे, झरी (बु) सरपंच दयानंद सुरवसे, मुजमिल सय्यद, देवानंद जाधव, विवेक शिंदे, राहुल सुरवसे, चंद्रकांत गंगथडे, शुभम गोरटे, बाळू पवार, ॲड. सादिक शेख, जयराम पाटील, नाना जगताप, श्याम देवकते पाटील, विशाल जाधव, रविशंकर आगलावे, युवराज काका सूर्यवंशी, श्रीधर जाधव, राम मुंगे, पांडुरंग कांडणगिरे, गोपाळ कानवटे, किरण पाटील, ग्रामसेवक महात्मे नागोराव घोगरे, मुस्ताक पठाण, संपतराव जाधव, साहेब शेख, हुसेन शेख, बाळू घोगरे, प्रदीप लवबंदे, भीमराव पांचाळ, बशीर पठाण, सुभाष सोनेवाड, धनराज कांबळे, नरसिंग दराडे, प्रकाश दराडे, तानाजी घोगरे, बाळू दादा घोगरे, इकबाल शेख, परमेश्वर घोगरे, रामानंद घोगरे, बालाजी घोगरे, रहीम खान पठाण, संतोष गुळवे, जगन्नाथ लवबंदे, नवनाथ कोलभूते, नाना घोगरे, लिंबराज घोगरे, अंकुश कांबळे, पठाण राजे, खान शादुल पठाण, श्रीधर करंडे, बालाजी करंडे, किशोर करंडे, शाहरुख शेख, अनिल घोगरे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज घोगरे यांनी केले.