किलबिलचा विद्यार्थी संसद पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.!!
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूलचा विद्यार्थी संसद पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणूनअहमदपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण काळे, सुप्रसिद्ध लेखक मोहीम कादरी शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. शिवशंकर पाटील, वृक्षमित्र प्राध्यापक अनिल चवळे ई. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संचालक ज्ञानोबा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनक जाजू रुचा मोगरगे व पर्यवेक्षक महावीर गोडभरले यांनी केले. निवडणूक प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता यावी या उद्देशाने विद्यार्थी संसदेचा हेड बॉय हेड गर्ल व रेड, ग्रीन, येल्लो, व ब्लू हाऊस साठीचे चार कॅप्टन या पदासाठी अतिशय शिस्तीने लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसदेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. छाननी समितीकडून अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना निवडणूक चिन्हाचे वाटप करून विद्यार्थ्यांना आपापल्या कल्पनेनुसार प्रचार मोहीम राबवण्याची परवानगी देण्यात आली. पोल चिट्ठी, पोलिंग बूथ तयार करून बोटाला शाई लावून सेल्फी पॉईंट तयार करून अतिशय नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. शाळेतील विद्यार्थी संसदेच्या वेगवेगळ्या पदाकरिता 62 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातून 28 विद्यार्थी बहुमताने संबंधित पदावर विजय मिळवला. विजयी उमेदवार खालील प्रमाणे आहेत. हेड बॉय अभय धर्मेंद्र भोसले हेड गर्ल साक्षी राजेंद्र सोनकांबळे
पदग्रहण समारंभामध्ये वरील सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचा परेड व शपथविधी सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅच व स्लॅश प्रदान करण्यात आले. यानंतर विजयी उमेदवारांनी विद्यार्थी मतदाराचे आभार मानून पुढील कार्यकाळामध्ये विद्यार्थी हिताचे कार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी विदयार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.