सुप्रसिद्ध विधितज्ञ् मा.संजय हुल्ले यांचा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार

सुप्रसिद्ध विधितज्ञ् मा.संजय हुल्ले यांचा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध विधितज्ञ् , आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या बळावर आजपर्यंत उदगीर तालुक्यातील हजारो लोकांना न्याय मिळवून देणारे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सध्याच्या युगातही माणुसकी जिवंत आहे याची जाणीव होते असे एक आदर्श विधितज्ञ्, एक अत्यंत प्रेमळ, सौज्वळ, निर्मळ असलेले एक दिलदार व दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले संजयजी हुल्ले यांची उदगीर बार कॉन्सिलच्या सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. जवळपास एकेवीस वर्षानंतर बार कॉन्सिलची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये संजयजी हुल्ले व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोलाचा वाटा आहे. त्यांची बार कॉन्सिलचे सचिव म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने, प्रा.सिद्धेश्वर पटणे व सौ.संगीता पटणे यांच्या वतीने संजय हुल्ले यांचा व त्यांच्या अर्धांगिनी सौ. प्रतिभाताई हुल्ले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे चिरंजीव एल.एल.बी.च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले भावी विधितज्ञ् चि.उत्कर्ष हुल्ले हेही उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!