खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात न लावल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा – विनोद तेलंगे यांची मागणी

खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात न लावल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा - विनोद तेलंगे यांची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतू जिल्हयातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही, अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक लातूर यांच्याकडे दिली आहे. मागणी करण्यात आली आहे की, खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक तसेच रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्णाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क या सारखे अनेक रुग्ण हक्काचा सदर सनद मध्ये समावेश आहे. तेच रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शासनाच्या सूचना आणि राष्ट्रिय मानवाधिकार आयोगाचा आदेशानुसार लावत नाहीत त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

त्याअनुषंगाने सर्व खाजगी रुग्णांलयांना त्याबाबत सदर सुचनांचे पालन न केल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी सुचना सर्व रुग्णालयाला देण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हाशल्य चकित्सक लातूर यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय यांना निर्देश दयावे.

जर खाजगी रुग्णालय यांनी आदेश पाळला नाही तर खाजगी बाह्य रुग्णालयाचा परवाना रद्द करा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र पुंगी वाजवा आंदोलन करण्यात येइल. असे प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, जिल्हा प्रवक्ता बंडेपा पडसलगे, उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुदे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, यांच्या वतीने देण्यात आले आहे.

About The Author