मतदार संघाच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर
ना.संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश
उदगीर (प्रतिनिधी) : राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विशेष अनुदान देण्यात येते यासाठी उदगीर जळकोट मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायतींना प्रत्येकी पाच – पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये उदगीर नगरपरिषद हद्दीतील मराठा समाज स्मशानभुमी विकसीत करण्यासाठी ३० लक्ष रु, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी ३० लक्ष रु., उदगीर येथील लिंगायत भवन येथे विद्युतीकरण व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी रु, प्रभाग एक मधील लिंगायत समाज समशानभूमी विकसित करण्यासाठी ३० लक्ष रु, मुस्लिम शादीखाना
विद्युतीकरण व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी रु, उदगीर शहरातील जळकोट रोड येथे मौलाना अबुल कलाम आझाद प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष रु, महात्मा गांधी गार्डन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणे सुशोभिकरण करण्यासाठी ४० लक्ष रु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गार्डन विकसीत करण्यासाठी २५ लक्ष रु, उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिदर रोड पुलापर्यंत स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी ५० लक्ष, प्रभाग ५ उदगीर येथील निडबनवेस सार्वजनिक स्मशानभूमीच्या समोरील मुस्लिम सार्वजनिक कब्रस्थानास संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी २५ लक्ष रु, प्रभाग १८ मधील यशवंत सोसायटी येथील खुल्या जागेस संरक्षणभिंत बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी २० लक्ष रुपये, उदगीर शहरातील अशा विविध विकास कामासाठी ५ कोटी रुपये तर जळकोट नगर पंचायत हद्दीतील प्रभाग १ ते प्रभाग १९ मधील सी.सी. रोड, नाली व लादीकरणासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असुन मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकुण १० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असुन राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.