इनरव्हील क्लब आयोजित सेवालय, हासेगाव प्रस्तुत हॅप्पी म्युझिक शो दिमाखदार सोहळ्याने उदगीरकर भारावलेले
उदगीर (प्रतिनिधी) : एच आय व्ही बाधित मुलांचा नृत्याविष्कार सेवालय हासेगाव प्रस्तुत व इनरव्हील क्लब उदगीर आयोजित विशाल फंक्शन हाॅल उदगीर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मंचावर प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या महानंदा बेहनजी , सेवालयाचे संस्थापक रवी बापटले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, डॉ रेखा रेड्डी याच बरोबर इनरव्हील क्लबच्या पुर्व अध्यक्ष,झोनल सब कोर्डिनेटर मीरा चंबुले,अध्यक्ष स्वाती गुरुडे,सचिव मानसी चन्नावार कोषाध्यक्ष पल्लवी मुक्कावार, चार्टर सेक्रेटरी शिल्पा बंडे, चार्टर आय एस ओ स्नेहा चणगे, सहसचिव प्रिया नारखेडे , एडिटर अलका येरोळकर,आय एस ओ योजना चौधरी यांची उपस्थिती होती.
एच आय व्ही बाधित मुलांचा आई वडील होऊन सांभाळ करणारे रवी बापटले सर म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचे रुप अनेक अनाथ निराधार व आजाराने बाधित बालकांना त्यांनी मायेची सावली दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करून अतिशय सुरेख देखणा असा नृत्याविष्कार सादर करण्याचे बळ त्यांना दिले आहे.
या मुलांचे कथन आणि सादरीकरण बघून प्रत्येक उपस्थितांच्या डोळ्यात पाणी,अंगावर काटा उभा राहत होता.दुर्दम्य आजाराशी झुंजणार्या या मुलांचा उत्साह नृत्यातील तरबेजपणा पाहून सगळे थक्क झाले.तब्बल तीन तास रंगलेला हा सोहळा अवर्णनीय होता. यासाठी अप्रतिम निवेदन करणारे कलाकार बालाजी सुड यांनी राजकीय नेत्यांच्या आवाजाची मिमिक्री करून लोकांच्या टाळ्या मिळवल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे कल्पना चौधरी,माउंट लिटेरा स्कूल प्रिया पोसते,दिपा आंबेसंगे पोस्ते पोद्दार स्कूल, सोनाली पाटील विद्यावर्धिनी प्रिती दुरूगकर ला.ब.शा.वि शकुंतला पाटील, शिवाजी महाविद्यालय उषा कुलकर्णी व प्राचार्य मनोज गुरुडे, मातृभूमी महाविद्यालय, दत्त गुरु इंग्लिश स्कूल, टाईम पब्लिक स्कूल, जिव्हाळा ग्रुप व मातृभूमी महाविद्यालयचा विद्यार्थी ज्ञानेश्वर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माउंट लिटेरा व पोस्ते पोद्दार यांनी प्रेक्षकांच्या येण्यासाठी वाहनांची सोय केली व विशाल फंक्शन हाॅल उपलब्ध करून देणारे वर्षा पाटील यांचे ही आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सौ अश्विनी देशमुख यांनी केले प्रास्ताविक स्वाती गुरुडे यांनी तर आभार प्रदर्शन सुहासिनी ताई सुरशेटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली. उदगीर मधील सगळे जेष्ठ श्रेष्ठ नागरिक,सर्व पत्रकार बंधु ,शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांची उपस्थिती होती.