लातूर जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लातूर जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील बहुजन विकास अभियानाच्या वतीने लातूर जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा त्वरित विनाविलंब देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह गांधी उद्यानासमोर तिफन आंदोलन करण्यात आले.गतवर्षीचा व यावर्षीचा पिक विमा द्या. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, निराधार, बेरोजगार, अपंग, विधवा यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या. रोजगार हमीचे कामे चालू करून जागेवरच सातशे रुपये मंजूर करून द्या. शेतकऱ्याच्या जनावरच्या चाऱ्यासाठी अनुदान द्या. सर्वे करण्यात वेळ न घालता सरसकट पिक विमा द्यावा.यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, संजय राठोड, नरसिंग गुरमे, आकाश कस्तुरे, लक्ष्मण आडे पाटील, सुलेमान पटेल, फिरोज पठाण, अमोल सूर्यवंशी, रवी डोंगरे, रमेश बर्गे, तेजाबाई कांबळे, सरुबाई सूर्यवंशी, सुळकेकर मिस्त्री, दिगंबर कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!