शिवाजी महाविद्यालयात लातूर जिल्हा वर्धापन दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी महाविद्यालय व इतिहास संकलन संस्था, लातूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालय येथे लातूर जिल्हा वर्धापन दिन व हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद नवले, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली चे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री डॉ. राधाकृष्ण जोशी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रवी सातभाई, डॉ. शांताताई जाधवर, डॉ. गणपत गट्टी यांची उपस्थित होती. हा कार्यक्रम इतिहास विभागाचे डॉ. सूर्यकांत सावंत यांनी आयोजित केलेला होता. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांनी इतिहास, इतिहासातील संशोधने, इतिहासातील पुरावे या गोष्टींवर सविस्तर मार्गदर्शन केले. भारताला इतिहास असल्यामुळे आज भारताची वाटचाल त्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.सूर्यकांत सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सूर्यवंशी बालाजी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनंत शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. संजय कोनाळे, डॉ. भालेराव व्ही के , डॉ.शोभा भिकाने,डॉ.संजय पाटील, प्रा धनराज बंडे, प्रा राहुल कांबळे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

About The Author