शिवनेरी महाविद्यालयात मतदार नोंदणी
शिरूर अनंतपाळ : येथील शिवनेरी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार तानाजी यादव म्हणाले, ज्या युवक व युवतींचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे व ज्यांचे १ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे अशा युवक व युवतींनी आपली मतदार नोंदणी करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बीएलओ देविदास सांगवे यांनी नवीन मतदारांची नोंदणी करून घेतली. यावेळी प्राचार्य डॉ. ए. बी. धालगडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग मुठे, डॉ. अमोल इंगळे, तहसीलच्या निवडणूक विभागाचे उत्तम कलबुर्गे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.