शिरूर अनंतपाळ भाजपा तालुकाध्यक्षपदी मंगेश पाटील

शिरूर अनंतपाळ भाजपा तालुकाध्यक्षपदी मंगेश पाटील

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुका भाजपाच्या तालुकाध्यक्षपदी माजी सरपंच मंगेश पाटील येरोळकर यांची फेरनिवड करण्यात आली असून मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा करून त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते अॅड. संभाजीराव पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, भाजपा नेते संजय दोरवे, दगडूजी साळुंके, माजी सभापती गोविंदराव चिलकुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, नगराध्यक्ष सौ. मायावती धुमाळे, धोंडीराम सांगवे, जयश्रीताई पाटील, प्रकाश कोरे, आप्पाराव नाटकरे उपस्थित होते.

तालुक्यातील येरोळ येथील मंगेश पाटील यांनी तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना भाजपा संघटनासह पक्षवाढीसाठी सतत काम केले आहे. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कट्टर सर्मथक समजले जाणारे व मंगेश पाटील यांनी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांसह पक्षांतर्गंत अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेवून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सलग दुसऱ्यांदा भाजपा तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.

तालुक्यात मंगेश पाटील हे उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणूनही परिचित आहेत. उत्कृष्ट संघटन कौशल्य व सोबत तरुणांची मोठी फळी व सर्व घटकांना सोबत घेवून काम करण्याची पद्धत यामुळे त्यांच्या तालुकाध्यक्षपदी निवडीमुळे पक्षाला फायदा होणार आहे. नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत मिळालेल्या संधीचा दिली.

उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी केला जाईल. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करून प्रत्येक बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांशी प्रत्येक कार्यकर्ता जोडून तालुक्यात पक्ष संघटन वाढविणार असल्याची ग्वाही मंगेश पाटील यांनी दिली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!