साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती आंबेगाव येथे संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती आंबेगाव येथे संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आंबेगाव येथे लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी आण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ, मुक्ताबाई सुर्यवंशी,विठ्ल कांबळे इंडियन आर्मी, मुरलीधर बोडके, व्यंकट शिंदे, अभंग सुर्यवंशी, श्रीनंद सुर्यवंशी जंयती अध्यक्ष, प्रभु सुर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी, मा पत्रकार लक्ष्मण रणदिवे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तसेच ध्वजारोहण विठ्ठल कांबळे इंडियन आर्मी, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. मुक्ताबाई सुर्यवंशी यावेळी प्रमुख उपस्थिती मधुकर सोनवणे समाज भुषण, मनोहर डाकरे, शिवाजी भोसले, विनोद सुर्यवंशी,पुंडे ज्ञानोबा शिक्षक ल,सा,क,म, विजयकुमार सुर्यवंशी पोलीस लेखक काठीकार, मुरलीधर बोडके,व्यंकट शिंदे ग्रामपचायंत सदस्य, जयंती समिती अध्यक्ष श्रीनंद सुर्यवंशी,,उपाध्यक्ष संभाजी सुर्यवंशी,व्यंकट शिंदे, सचिव जयराम सुर्यवंशी, मारोती सुर्यवंशी, वामन सुर्यवंशी, मिलिंद कांबळे,नवनाथ सुर्यवंशी, गुडांजी सुर्यवंशी, तसेच जय लहुजी ग्रुप आंबेगाव, आदिची उपस्थिती होती. तसेच शाळेतील विद्यार्थीही मनोगत व्यक्त केले होते. विजयकुमार सुर्यवंशी यांनी आण्णासाठे यांच्या कार्यकाळ खडतर जीवन व साहित्य लोकापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे आजही फकिरा कांदबरी महाराष्ट्राला पहिला बहुमान साहित्याचा माध्यमातून मिळवले आहे अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पवाडे, लोकनाट्य हे कला जिवंत ठेवण्याचे काम फक्त आण्णाभाऊ साठे यांनीच करु शकले आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरा घरात अण्णाभाऊचा विचार पोहचला पाहिजे,असे सखोल मार्गदर्शन केले व सुत्रसंचलन मारोती सुर्यवंशी तर आभार अभंग सुर्यवंशी उर्फ फकिरा यांनी मांडले, भव्य दिव्य मिरवणूक सर्व बहुजनांच्या सहकार्याने जंयती मोठ्या उत्साहाने पार पडली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!