शिवाजी महाविद्यालयात जनजागरण रॅली संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगरपरिषद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर शहरातून स्वच्छता, पाणीबचत व रस्ते सुरक्षा या विषयावर जनजागरण करण्याच्या उद्देशाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद नवले, नगरपरिषद उदगीरचे कार्यालयीन अधीक्षक सलीम भाई उस्ताद, पोलीस स्टेशन उदगीरचे महेश मुसळे यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज देऊन रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे, अधीसभा सदस्य डॉ विष्णू पवार, नगर परिषदेचे इंजिनियर अतुल तोंडारे, महारुद्र गालट, प्रमोद काष्टेवाड ,मयूर शिवशेट्टे, वीरेंद्र उळागड्डी, पोलीस हवालदार शेख तय्यब ,सल्लागार डॉ एल एच पाटील यांची उपस्थिती होती.
शिवाजी महाविद्यातून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली जळकोट रोड, कॅप्टन कृष्णकांत चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक या मार्गाने नगरपरिषदेला आली. नगरपरिषदेला या रॅलीचा समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध उपदेश करणारे फलक आणि घोषणांच्या मार्फत उदगीर नगरीतील लोकांच्या जनजागृतीचे कार्य केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नगर व परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश शिंदे, डॉ अनंत टेकाळे व प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी या रॅलीचे नियोजन केले.