लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावे म्हणून,मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधव केंद्रे यांनी मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय करून दिला.हॉकी खेळामध्ये त्यांनी कसे प्रभुत्व मिळविले. याबद्दल सविस्तर माहिती दिली. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी ऑलम्पिक मध्ये एकूण १००० गोल केले होते. भारत सरकारने त्यांना खेळरत्न पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळातून देशाला संपूर्ण विश्वामध्ये नावलौकिक मिळवून दिला.स्थानिक खेळाडूंची माहिती सांगितली.फिट इंडीया मिशनचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.खेळामुळे मन प्रसन्न व शरीर बलवान बनते.चांगलं मन चांगल्या शरीरात राहतं.प्रत्येकाने दररोज किमान एक तास तरी खेळलेच पाहिजे.खेळाडूंना शासन बक्षीसपण दते.नोकरीमध्ये संधी मिळते.आजच्या दिवशी मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती मिळवून वाचावी व दररोज एक तास कोणताही खेळ खेळण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना भारत सरकार,शिक्षण मंत्रालय,यांच्या परिपत्रकातील फिट इंडीयाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुकाराम पेद्दावाड यांनी केले.

About The Author