श्यामलाल हायस्कूलमध्ये “शौर्यगाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची” व्याख्यानमालेचे आयोजन

श्यामलाल हायस्कूलमध्ये "शौर्यगाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची" व्याख्यानमालेचे आयोजन

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल स्मारक विद्यालयात आज दि.29 ऑगस्ट 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बाबासाहेब परांजपे फौंडेशन, जिल्हा माहिती अधिकारी लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्यगाथा मराठवाडा मुक्ती संग्रामाची या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. संजय तोंडारकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी,मराठवाडा मुक्ती संग्रामात समर्पित केले त्या सर्व शूरवीरांना अभिवादन व त्यांच्या कार्याची ओळख आजच्या नविन पिढीला होणे आवश्यक आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामास 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने या व्याख्यानमालेचे हेतूपूर्वक आयोजन करण्यात आलेले आहे, असे मत प्रमुख वक्ते प्रा. संजय तोंडारकर यांनी व्यक्त केले, मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मा भाई श्यामलालजी आर्य, कर्मवीर भाई बन्सीलालजी आर्य तसेच हैद्राबाद, कर्नाटका,मराठवाडा,तेलंगणा परिसरातील आर्य समाज, किसान दल, स्टेट काँग्रेस इत्यादीचे खुप मोठे योगदान आहे. असे मत व्याख्यानमालेचे समन्वयक धनंजय गुडसुरकर यांनी व्यक्त केले. व प्रभावीरीत्या मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीरांच्या कार्याचा उजाळा सर्वांना करून दिला. श्यामलाल स्मारक संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी सर्व शूरवीरांचे स्वप्न आपण साकार करूयात असा संदेश दिला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक आनंद चोबळे, पर्यवेक्षक राहुल लिमये , सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके तर आभार संजय देबडवार यांनी व्यक्त केले.

About The Author