लातूर रेल्वे स्टेशनच्या पिट लाईनचा प्रश्न मार्गी लागणार – खा. शृंगारे
लातूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला लातूर रेल्वे स्थानकावरील पिटलाईनचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. त्यामुळे लातूर स्थानकावरील पिट लाईनच्या कामासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून हे काम लवकरात लवकर सुरू होईल अशी ग्वाही खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली. लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांसह सर्व रेल्वे गाड्यांची विशेष देखभाल करणे, रेल्वे स्वच्छता करणे, रेल्वे गाड्यांमधील विविध तांत्रिक अडचणींची देखभाल करणे, रेल्वेतील विविध मशीन, रेल्वे इंजिन रेल्वे सुरक्षा यांसारख्या रेल्वे गाडीच्या सर्व पायाभूत सुविधांचे कामे करणे रेल्वे पिटलाईन मुळे लातूर रेल्वे स्थानकावर शक्य होणार असून पिटलाईनमुळे रेल्वेंची देखरेख होत असून जर लातूर रेल्वे स्टेशनवर पिटलाईन सुरु झाली तर येणाऱ्या काळात लातूर रेल्वे स्थानकावरून नवीन लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांची सुरुवात होऊन येणाऱ्या काळात मराठवाड्यातील रेल्वेसेवा अत्याधुनिक होणे आणि रेल्वेसेवा गतीमान होने सुलभ होणार असल्याचेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी प्रकल्प लातूर हा सुरू झाल्यानंतर लातूर रेल्वे स्थानकावर लांब पडल्याच्या नवीन रेल्वे गाड्यांची वर्दळ वाढणार आहे. यामुळे लातूरची आर्थिक बाजारपेठ देखील विस्तृत होणारा असून लातूर रेल्वे स्थानकावर पीटलाईनची अत्यंत तातडीची गरज असून त्यासाठी मी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितले.