युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम
लातूर (प्रतिनिधी) : दरवर्षी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष, प्रभाग क्र.१८ चे मा. नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त १ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज एमआयडीसी, लातूरच्यावतीने जाहीर सत्कार, १ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते २.३५ या कालावधीत स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल एमआयडीसी, लातूर येथे भव्य चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत, सकाळी ११ वा. युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कव्हा ग्रामस्थांच्यावतीने विशेष नागरी सत्कार व कव्हा येथील शेखमियाँ दर्गा चादर चढविणे, दुपारी १२ वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अन् ?नसेवा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी ०१ वा. स्वामी विवेकानंद विद्यालय एमआयडीसी लातूर येथे खुशी फाऊंडेशनच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी विद्यालय
युवा नेत्यांचा सन्मानव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
१ सप्टेंबर २०२३ रोजी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे साजरा होत आहे. या सामाजिक उपक्रमाबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी व विशेष कौटुंबिक सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबरोबरच सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी मजगे नगर कैलास निवासस्थानी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत.
बिटरगाव येथे युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सत्कार, शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे सकाळी ११ वा. सत्कार सोहळा, ग्रंथतुला व फळे वाटप करण्यात येणार आहे. ०६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज एमआयडीसी, लातूर येथे रक्तदान शिबीर व ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता दयानंद महाविद्यालय सभागृह लातूर येथे डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे करीअर, व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे.