शुद्ध वंशावळीच्या देवणी गोवंश पैदाशीसाठी गोरक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा – डॉ अनिल भिकाने
उदगीर (प्रतिनिधी) : देवणी गोवंश हे लातूर जिल्ह्याचे भूषण असून या गोवंशास राष्ट्रीय पातळीवर २७ वेळा सन्मानित केले गेले आहे. त्यामुळे देवणी गोवंशाचे संवर्धन व जतन करन्यासाठी गोशाळेतील गाईचें देवणी सदृश,लाल कंधारी सदृश व इतर असे वर्गीकरण करून शुद्ध वंशावळीची गोपैदास करावी, व शुद्ध गोवंशाची पैदास करणारी महाराष्ट्रातील एक आदर्श गोरक्षण संस्था म्हणून पुढे आणावी असे आवाहन नागपुर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक डॉ. अनिल भिकाने यानी केले . ते संघर्ष मित्र मंडळ , नवयुक व्यापारी गणेश मंडळ व नारायण ॲग्रो प्रा.लि. उदगीर संचलित सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेस भेट प्रसंगी बोलत होते.
डॉ. भिकाने पुढे म्हणाले कि, अलिकडिल काळात गोशाळेतील गाईंच्या प्रकृतीमानात आमूलाग्र सुधारणा झाली असून गाई अत्यंत सशक्त झाल्या आहेत. वासरेही वजनदार व सुदृढ दिसत आहेत. ही सुधारणा दर्जेदार व मुबलक चारा व खुराक दिल्यामुळे दिसून येत आहे.बहुवार्षीक चार्याचे उत्पादन घेतले जात आहे.गोशाळा स्वालंबी करणेसाठी गोमुत्र व गोमय मुल्यवर्धनाचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत .हे कौतुकास्पाद कार्य केल्याबद्दल संचालक मंडळाचे विशेषतः नारायण ॲग्रोचे सागर महाजन तसेच प्रशांत मांगुळकर व सहकाऱ्याचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यापूर्वीच्या काळात डॉ. रामप्रसाद लखोटिया व सहकाऱ्यानीही गोवंश गोवर्धन प्रकल्प राबवुन गोशाळेच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबदल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी प्रशांत मांगुळकर , नारायण वाकुडे, इसाक भाई , शिवदासे , जयभारत बोरोळे, स्वप्नील रेड्डी आदी उपस्थित होते . याप्रसंगी डॉ. भिकाने यांचा नारायण वाकुडे यांचे हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन नरसिंग कंदले यानी केले.