दयानंद शिक्षण संस्थेचा योग पॅटर्न सर्वदूर पोचावा – शशिकांत पाटील

दयानंद शिक्षण संस्थेचा योग पॅटर्न सर्वदूर पोचावा - शशिकांत पाटील

दयानंद शिक्षण संस्थेत योग प्राणायाम ध्यान शिबिराचा समारोप

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेने सुरू केलेला योग पॅटर्न हा लातूर पॅटर्न प्रमाणे सर्वत्र पोचवा असे प्रतिपादन झी 24 तासचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी केले. ते दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने योग, प्राणायाम व ध्यान शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की,”योग प्राणायाम आणि ध्यान यामुळे कार्यक्षमता वाढते, मन प्रसन्न होते याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होते. या शिबीराचा लाभ केवळ पाच दिवसापुरता मर्यादित न ठेवता योग प्राणायाम हा जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम सोळुंके म्हणाले की, दि 9 ते 13 जून या कालावधीत दयानंद शिक्षण संस्थेतील पदाधिकारी , सर्व प्राचार्य , प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दयानंद शिक्षण संस्था व दि आर्ट ऑफ लिव्हिंग ने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जिल्हा समन्वयक डॉ वसुंधरा गुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या की,”श्री श्री रवीशंकर यांच्या प्रयत्नातून दिव्य समाज निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व्हावा यासाठी हे शिबीर निश्चितच उपयुक ठरेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते. कु.रोहिणी लखादिवे व कु.सई शिंदे या कला शाखेतील बारावीच्या विद्यार्थिनीनी या शिबिरा विषयी ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या तर प्राध्यापकांच्या वतीने डॉ. अंजली जोशी, डॉ. संतोष पाटील यांनी शिबिराविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन पतंगे, प्रा. इरफान शेख, प्रा. महेश जंगापल्ले यांनी परिश्रम घेतले.

About The Author