जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेत साहित्याचे वाटप

जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळेत साहित्याचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी) : जीवन विकास निवासी मतिमंद कर्मशाळा येथील 15 प्रवेशित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन अधिकारीता संस्था मुंबई व संवेदना प्रकल्प लातूर यांच्या सौजन्याने विशेष शैक्षणिक साहित्य किट चे वितरण करण्यात आले. तसेच विवेकानंद मेडिकल फाउंडेशन लातूर तर्फे बुद्धिबाधित दिव्यांग व्यक्ती व पालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.या वितरण कार्यक्रमाला डॉ. राजेश पाटील, अध्यक्ष संवेदना प्रकल्प, संतोषकुमार नाईकवाडी, समाजकल्याण अधिकारी जि. प. लातूर व डॉ. वसीम अहमद प्रभारी दिव्यांजन संस्थान मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सदर कार्यक्रम लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थ्यांना,पालकांना हे विशेष शैक्षणिक साहित्य मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव निवृत्ती वडगावकर , मुख्याध्यापक राजपटेल मलिक यांनी अभिनंदन केले.

About The Author