बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल तर्फे रक्षाबंधन साजरा

बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल तर्फे रक्षाबंधन साजरा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मधील मुलींनी आज लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला.सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळी प्राचार्य सर अनिल पॉल यांना एका चिमुकलीने राखी बांधली व नंतर शाळेतील ३ टीम बनवून साजरी करण्यासाठी बाहेर विद्यार्थी गेले. ज्यामध्ये लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रम, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, मिलर्टी कॅम्पस, विवेकानंद हॉस्पिटल आणि गांधी चौक पोलिस स्टेशन या सर्व ठिकाणी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व आजोबांनी राखी बांधून घेतली व सर्व मुलींना भरभरून आर्शिवाद दिले. तसेच गांधी चौक, मिलर्टी कॅम्पस तथा शिवाजी नगर पोलीस स्टेशन या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यानी राखी बांधून घेतली व त्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांना चॉकलेट खायला दिले.विवेकानंद हॉस्पिटलमध्ये अडमीट असलेल्या पेशंट तथा तेथील डॉक्टरांनी तथा कर्मचारी यांना राखी बांधून उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन साजरी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी सर्वांनी यासाठी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!