“लढा!मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा!” या विशेषांकाचे प्रकाशन
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील संस्कृती मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते श्री.माधवजी भण्डारी यांच्या हस्ते सांस्कृतिक वार्तापत्राच्या “लढा!मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा!” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अहमदपूर तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. पस्तीसहून अधिक स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना माधव भंडारी म्हणाले की रझाकारी प्रवृत्ती अजूनही जिवंत आहेत. रझाकारांच्या वंशजांना आपल्या पूर्वजांनी जनसामान्यांवर केलेल्या अन्याय अत्याचाराची जराशीही खंत नाही. त्यांनी संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी. यावेळी बोलताना सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सौ. सुनीता पेंढारकर यांनी मतदानामधून रझाकारी प्रवृत्तींविरूद्ध एकजूटता दाखवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. (मेजर) मधुसूदन चेरेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी अहमदपूर तालुक्यातील स्वातंत्र्यलढ्याची माहिती दिली. या प्रसंगी हा स्वातंत्र्यलढा लेखणीद्वारे प्रकट करणारे प्रा.गुरूनाथ चवळे व श्री व सौ. नारायण कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. विवेक साप्ताहिकाचे कार्य आजीवन केल्याबद्दल वामन पुजारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री विनायकरावजी पाटील, मा.आ.बब्रुवान खंदाडे, मा.गणेशजी हाके, दिलीपरावजी देशमुख, भारतभाऊ चामे, मा. शिवानंदतात्या हेंगणे, व सौ भातांब्रे आदि उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचे वारस या नात्याने श्रीमती लक्ष्मीबाई जंगापल्ले, सौ.ज्योती स्वामी, निशिकांत देशपांडे, दत्तात्रय उगीले, अरूण देशपांडे, दत्ता गलाले, राहेबा बनसोडे, श्री.जसवंत ठाकरे, जयगणेश सूरजमल, मंगेश रणखांब, डाॅ.बोधनकर, अॅड. भारतभूषण क्षीरसागर, किशोर कदम, नितीन व प्रवीण नखाते, वीरेंद्र रेड्डी, वाघमारे, कांबळे, श्री.प्रवीण देशमुख, शरद पाटील, इत्यादींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विश्वरूप धाराशिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री.देवेंद्र देवणीकर, श्रीकांत भुतडा, प्रेमचंद पोकरणा, केशव मुंडकर, अंगद सांगुळे, गुरूनाथ शेटकार, मधुकर धडे, नंदकुमार कोनाले, पांडुरंग लोकरे, ॲड. स्वप्नील व्हत्ते, रणजित चौधरी, शंकरप्पा भालके,लक्ष्मण फड, अमित बिलापट्टे, अशोक गायकवाड, सुनील मजगे, प्रशांत घाटोळ, गणेश हालसे, महेश महाजन व संपन्न कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन सचिव उमाकांत कोनाले यांनी केले. वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.