बिर्ला स्कूलचे समुहगायन स्पर्धेत यश
लातूर (प्रतिनिधी) : भारत विकास परिषद सिध्देश्वर शाखा लातूर आयोजित चेतना के स्वर या समुहगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण १६ शाळांचा सहभाग होता. या स्पर्धेत एक हिंदी गीत आणि एक संस्कृत गीत असे सादरीकरण होते. यात बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूलमधील मुलांनी अप्रतिम असे सादरीकरण करुन परिक्षकांचे आणि सर्व श्रोत्यांची मने जिंकली. आणि त्यात बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूलला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या त्यांच्या यशस्वितेसाठी शाळेतील संगीत शिक्षक कृष्णा कुलकर्णी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांना साथीदार म्हणून बसवेश्वर कॉलेजमध्ये संगीत शिक्षक असलेले प्रा.गोविंद पवार व तबला साथ दिनेश पोखरकर यांनी केली. मुलांच्या या यशाबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे. शाळेचे डायरेक्टर सी.ए.संभाजी सरडे, सी.ए.दिगंबर साके, अॕड.सचिन सुळ तसेच शाळेचे प्राचार्य अनिल पॉल व उपप्राचार्य अजय शर्मा यांनी मुलांचे यशस्वितेसाठी कौतुक केले.