ग्रामीण भागातील रस्ते विकसित करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंकुश पाटील यांचा पाठपुरावा
लातूर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खड्डेमय झाले असून कित्येक रस्ते तर खूपच छोटे झाले आहेत. साईड पट्ट्याचे काम आणि झिजल्यामुळे रस्त्याच्याकडेला झालेले मोठमोठे खड्डे याचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता यांना भेटून राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी रस्ते विकासाची मागणी केली आहे.
यामध्ये प्रामुख्याने देवनी ते येनकी हा रस्ता साडेपाच मीटर रुंदीचा करावा. त्याचप्रमाणे बोरूळ ते सिंधीकामठ हा रस्ता देखील साडे पाच मीटर रुंदीचा करावा. या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद अधीक्षक अभियंता अनिलराव कुलकर्णी यांनी हिरवी झेंडी दाखवली असून, लवकरच या संदर्भात देखील योग्य ती कारवाई करून काम सुरू करू. असे आश्वासन दिले आहे. सध्या निलंगा ते उदगीर या रस्त्याचे काम चालू असल्याने या रस्त्यावरून होणारी वाहतूक ही देवणी ते येनकी या रस्त्यावर होत आहे. त्यामुळे हा रस्ताच आत्ता सध्याचा मुख्य रस्ता झाला आहे.रस्ता लहाण असल्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण होत असून वाहनधारकांना होणारी गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने तात्काळ रस्त्यांचे रुंदीकरण करावे,अशी मागणी अंकुशराव पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे बोरूळ ते सिंधीकामठ हा रस्ता भालकी ला जाण्यासाठी जवळ असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. असेही निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी दिले आहेत.