कावेरीबाई काळे यांचे दुःखद निधन

कावेरीबाई काळे यांचे दुःखद निधन

अहमदपूर ( प्रतिनिधि) : येथील मारवाडी समाजातील जेष्ठ महिला पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्या कावेरीबाई श्रीनिवास काळे यांचे दीर्घ आजाराने वयाचा 92व्या वर्षी पुणे येथील राहत्या घरी दि 8 रोज शुक्रवारी सकाळी 10 वाजता दुख:द निधन झाले. त्यांच्यावर दि. 09 रोज शनिवारी सकाळी 11 वाजता मारवाडी स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. कावेरीबाई या पुरोगामी चळवळीचे प्रमुख नेते स्वर्गीय श्रीनिवास काळे यांच्या पत्नी असून त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक लढ्यामध्ये त्यांची खंबीर साथ होती. गेल्या तीस वर्षापासून चालणा-या श्रीनिवास काळे समृती समितीच्या वतीने चालणाऱ्या व्याख्यानमालेच्या त्या मार्गदर्शक होत. त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, सुना, नातवंडे, पर्तवंडे असा मोठा परिवार असून मराठवाडा साहित्य परिषदे चे अध्यक्ष सत्यनारायण काळे, पुणे स्थीत उद्योजक गिरीधारी काळे, उद्योजक रामनिवास काळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author