विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे-डॉ.एस.एम.गायकवाड
उदगीर- (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात धवल क्रांतीचे प्रणेते डॉ.वर्गीस कुरियन यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दुग्धशास्त्र अभ्यास मंडळाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.एस.एम.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दुग्धशास्त्रातील विविध संधीबाबत मार्गदर्शन केले, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आता नियमित अभ्यासाबरोबरच आपले लक्ष संशोधनाकडे वळवावे. महाविद्यालयीन जीवनात सुरुवातीला संशोधन करताना काही चुका होतीलही, परंतु भविष्यात त्याची फलश्रुती मात्र यशस्वीतेकडे नक्कीच जाईल असे प्रतिपादन केले. कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य पदी नियुक्त झाल्याबद्दल प्रा.एस.जी.कोडचे यांचा डेरी सायन्स विभागातर्फे सत्कार करण्यात आला. प्रा.कोडचे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय विभाग प्रमुख डॉ.सुरेश लांडगे यांनी करून दिला. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील यांनी केला. कार्यक्रमासाठी विभागातील प्रा.डॉ.ए.एस.होनकर, प्रा.रहिम पिंजारी तसेच अकरावी ते पदव्युत्तर वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.बी.रंगवाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एस.एम.गायकवाड यांनी मानले.