आयुर्वेदिक जीवनशैली हीच आरोग्याची गुरुकिल्ली – आर्युवेचार्य डॉ. प्रवीण बढे यांचे प्रतिपादन

आयुर्वेदिक जीवनशैली हीच आरोग्याची गुरुकिल्ली - आर्युवेचार्य डॉ. प्रवीण बढे यांचे प्रतिपादन

पुणे (प्रतिनिधी) : आयुर्वेदिक औषधे हीच आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीतपणे पार पडत असतात. त्यामुळे शरीर सतत उर्जावान असते, पण त्यासाठी योग्य आहार,विहार आणि तणाव रहित विचारशैलीही अंगिकारावी लागते. असे प्रतिपादन प्रिस्टाईन आयुर इंडियाचे सर्वेसर्वा आयुर्वेदाचार्य डॉ प्रवीण बढे यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील वल्लभनगर येथील बसस्थानकात रोटरी क्लब पिंपरी चिंचवड आणि प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रा.लि.च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ.प्रवीण बढे हे बोलत होते. यावेळी रोटरी क्लब पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव सुनील होळ,संयोजक सदाशिव काळे, संचालक सदाशिव कानेटकर, वल्लभ नगर बस स्थानकच्या वाहतूक निरीक्षक वर्षा डहाके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात बसस्थानकात राज्यातून येणाऱ्या बस कंडक्टर,चालक,वाहक, प्रवाशांसह जवळपास 200जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये मधुमेह, डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार, पोटाचे विकार, संधिवात, पित्त, मान, पाठ दुखणे यासह इतर आजारांवर जर्मन टेक्नॉलॉजी मशीनने मोफत तपासणी करून अल्प दरात आयुर्वेदिक औषधी देण्यात आली.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रिस्टाइन आयुर इंडियाचे आरोग्य सल्लागार बापुसाहेब काळे, तानाजी माने, सचिन पवार, धनराज मामा यवले, भूषण पंचवाडकर, हाजी शेख, हेमंत देवकर यांनी परिश्रम घेऊन जर्मन टेक्नॉलॉजी मशीन द्वारे तपासणी करून आरोग्य सल्ला दिला.सदर शिबिराला अहमदपूर जि. लातूरचे प्राचार्य तथा प्रिस्टाइनचे आरोग्य सल्लागार डॉ. वसंत बिरादार यांनी सदिच्छा भेट दिली.

About The Author