आई,वडील आणि शिक्षकांवर भक्ती करा – डॉक्टर माधवी जाधव

आई,वडील आणि शिक्षकांवर भक्ती करा - डॉक्टर माधवी जाधव

उदगीर (प्रतिनिधी) येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात, विशाखा समिती तथा महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनींचा समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनिता मुळखेडे, प्रमुख अतिथी डॉक्टर माधवी जाधव, कार्यक्रम प्रमुख नीता मोरे, ज्योती घोडके उपस्थित होते.
मुलींचे समुपदेशन करताना शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. अन्न, आहार,विहाराचे सुयोग्य नियोजन करत गुळ, शेंगदाणे, पालेभाज्या, डाळी,अंडी,दूध,बाजरी यांचा आहारात समावेश करा. भरपूर खेळा. स्वतःच्या वागण्याने आई-वडिलांना त्रास होणार नाही अशी काळजी घ्या. स्वतःचे जगणे सुंदर करा. असे विस्तृत मार्गदर्शन डॉक्टर माधवी जाधव यांनी केले. भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्यात महिलांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून प्रगती करा. असे अध्यक्षीय समारोपात अनिता मुळखेडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी चिखले, प्रास्ताविक प्रांजल पाटील, स्वागत व परिचय प्रज्ञा कांबळे, आभार तनुजा राठोड, तर कल्याण मंत्र सौ ज्योती घोडके यांनी सादर केले.कार्यक्रम प्रमुख नीता मोरे,विजया गोविंदवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अंकिता नळगिरकर, ऋतुजा श्रीमंगले, भक्ती फुलारी,वैभवी जाधव,प्रज्ञा कांबळे, आनंदी स्वामी, श्रावणी जगळपुरे यांचे सहकार्य लाभले. तब्बल 200 विद्यार्थिनींनी या समुपदेशनाचा लाभ घेतला. मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले,कृष्णा मारावार यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author