कु.भक्ती सिद्धेश्वर पटणे सामान्य ज्ञान परीक्षेत उदगीर तालुक्यातुन सर्वप्रथम
उदगीर (प्रतिनिधी) : एम.के.सी.एल(MKCL), महाराष्ट्र व सी-डॅक कॉम्प्युटर,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खुल्या शालेय तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेली कु.भक्ती सिद्धेश्वर पटणे ही विद्यार्थिनी उदगीर तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे. या परीक्षेला उदगीर तालुक्यातून एकूण पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले होते, आणि त्यातून कु.भक्ती पटणे ही सर्वप्रथम आलेली आहे. असे स्पर्धेचे संयोजक प्राचार्य सतीश उस्तुरे यांनी सांगितले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कु.भक्तीने मिळवलेल्या या यशाबद्दल लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड , पर्यवेक्षक मारावार, संस्कृतचे शिक्षक किरण नेमट, सुप्रसिद्ध साहित्यिका सौ.अनिता येलमट्टे , सौ.सविता कोरे , सौ.बरदापूरकर, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख पडलवार यांच्या हस्ते कु.भक्तीचा विविध पुस्तके व पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कु.भक्ती हिने या यशाचे श्रेय शाळेतील सर्व गुरुजणांना त्याच बरोबर आजोबा प्रा.गुंडप्पा पटणे, आज्जी सौ.नागीणबाई पटणे, वडील प्रा.सिद्धेश्वर पटणे, आई सौ.संगीता पटणे, मामा इंजि.जगदीश सावळे, मामी प्राचार्या.सौ.नम्रता सावळे इत्यादीना दिले आहे. कु.भक्तीच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ बनसोडे, माजी आमदार गोविंदआण्णा केंद्रे, सहकारमहर्षी चंदरआण्णा वैजापूरे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वरजी उर्फ मुन्ना पाटील, माजी जि.प.अध्यक्ष राहुलजी केंद्रे, हिंगोली लोकसभेचे प्रभारी रामदासजी पाटील, खरेदी विक्री संघांचे चेअरमन भारतभाऊ चामले, पी.टी.एचे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, सुप्रसिद्ध विधितज्ञ् तथा वकील संघांचे सचिव संजयजी हुल्ले, चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांतजी पाटील, फ़ॉरेस्ट ऑफिसर बालाजी मुदाळे, श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा.प्रदीप वीरकपाळे, प्रा.सोमनाथ बिराजदार, सुनिल रंडाळे, उमाकांत सिद्धेश्वरे, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.संजय जामकर, प्रा.अशरफ खान, प्रा.ज्ञानेश्वर केंद्रे इत्यादिनी अभिनंदन केले आहे. याशिवाय कु.भक्तीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.