चांगली पुस्तके वाचा चांगले विचार पेरले जातील – डॉक्टर अस्मिता भद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात, विशाखा समिती तथा महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनींचा समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमोदिनी रेड्डी, प्रमुख अतिथी डॉ. अस्मिता भद्रे , पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कार्यक्रम प्रमुख विजया गोविंदवाड,नीता मोरे, शोभा नेत्रगावकर उपस्थित होते.मुलींचे समुपदेशन करताना डॉक्टर अस्मिता भद्रे यांनी चौरस आहाराचे महत्व आणि त्याचा शरीरासाठी उपयोग सांगितले.फास्ट फूडचा शरीराला काही उपयोग नाही, त्यामुळे फास्ट फूड खाणे टाळावे, व्यायाम, पुरेशी झोप आणि मैदानी खेळ याचे महत्त्व विशद केले. गुड टच, बॅड टच याची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्रमोदिनी रेड्डी यांनी योग्य केशभूषा. वेशभूषा , शिस्त याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री पुजारी, प्रास्ताविक अन्विती रोडगे, स्वागत व परिचय वैभवी दुडीले, आभार अनुष्का कासले, तर कल्याण मंत्र स्नेहल डिकळे यांनी सादर केले. कार्यक्रम प्रमुख विजया गोविंदवाड,नीता मोरे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अंकिता नळगिरकर, श्वेता जावरे, भक्ती फुलारी, वेदिका कलबुर्गे, तनुजा राठोड, प्रज्ञा कांबळे, प्रांजल पाटील, संस्कृती सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. तब्बल 125 विद्यार्थिनींनी या समुपदेशनाचा लाभ घेतला. मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले,कृष्णा मारावार यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.