विनयभंग प्रकरणातील आरोपीस अटक

विनयभंग प्रकरणातील आरोपीस अटक

पुणे (केशव नवले) : एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भातली माहिती अशी की, श्रीकांत मिनीनाथ जगदाळे याने पीडित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अशा पद्धतीची फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनदाट यांना या प्रकरणाचा तपास करण्याचे सूचित केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या अनुषंगाने माहिती मिळवली असता, आरोपी हा रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोरेगाव येथे असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने आरोपी श्रीकांत जगदाळे यास अटक केली आहे. यासंदर्भात पुढील कारवाई रांजणगाव पोलीस स्टेशन मार्फत केली जात असल्याने आरोपीला रांजणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, जनार्दन शेळके, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत,अजित भुजबळ, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अक्षय जावळे, अभिजीत एकशिंगे, गुरु गायकवाड यांच्या विशेष पथकाने पूर्ण केली आहे. आरोपीला लगेच अटक केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author