भोई समाज गणेश मंडळ अध्यक्षपदी प्रशांत रंगवाळ यांची निवड

भोई समाज गणेश मंडळ अध्यक्षपदी प्रशांत रंगवाळ यांची निवड

उदगीर (एल. पी. उगीले) : येथील भोई गल्लीमध्ये समाज बांधवांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली आणि त्यात भोई समाज गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून भोई समाज गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत तुळशीदास रंगवाळ यांची उपाध्यक्षपदी नितीश मारुती हिवरे यांची तर सचिवपदी निलेश विश्वंभर फुरमाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीत अंकुश रंगवाळ, मधुकर मामुलवार, चंद्रकांत रंगवाळ, विजय मामुलवार, रुपेश फुरमाळकर, भागवत अनंतवाळ, गोविंद कोमटे, ओमकार मदेवार, शक्तिमान मदेवार यांची निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकारिणीचे समाज बांधवांनी अभिनंदन केले असून या गणेश मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहिती कार्यकारीनीच्या वतीने देण्यात आली आहे.

About The Author

error: Content is protected !!