औसा येथे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती ची बैठक संपन्न

औसा येथे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती ची बैठक संपन्न

लातूर (एल.पी.उगीले) : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये दिनांक 12/09/2023 रोजी प्रशासकीय इमारत, औसा येथे 12.30 ते 14.00 पावेतो औसा तालुक्यातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच व राजकीय पुढारी ,शांतता समिती सदस्य यांची येणारे गणेशोत्सव पोळा व ईद-ए-मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली .

सदर बैठकीस अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीत गणेश मंडळाना गणेशोत्सव शांततेत, आनंदात साजरा करण्याचे आव्हान केले. त्यांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या जसे, गणेश मूर्तीची देखभाल करण्याची जबाबदारी गणेश मंडळावर असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या गणेश मंडळाचे स्वयंसेवक गणेश मूर्ती जवळ संरक्षणासाठी गणेश स्थापनेपासून विसर्जन होईपर्यंत नियमन संरक्षण करावे., गणेशोत्सवासाठी आपण देणगी किंवा पट्टी गोळा करण्याकरता आपणास धर्मदाय आयुक्त कार्यालय लातूर यांची परवानगी आवश्यक असून सदर परवानगी घेऊनच परवानगीची प्रत पोलीस ठाणे औसा येथे जमा करावी व देणगी किंवा पट्टी गोळा करत असतात कोणालाही जोर जबरदस्ती करू नये ., गणेश स्थापना स्टेज हे मजबूत असावे. स्टेज मजबूत असल्याचे खात्री करावी. स्टेज कोसळून अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच स्टेजवर आग प्रतिरोधक अग्निशामक व्यवस्थेची सोय करावी.,स्टेजचे उजव्या बाजूस गणेश मंडळाचे कार्यकरणीची यादी मोबाईल नंबर सह लावावी., गणेश स्थापना करिता एम एस ई बी कडून अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी.उत्सवा दरम्यान प्रसाद वाटप करताना त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.,रस्त्यावर स्टेज मारत असताना रोडचा 1/3 पेक्षा जास्त वापर करू नये तसेच मंडळाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.,गणेशोत्सवामध्ये डीजे किंवा डॉल्बीचे वापरावर पूर्णता निर्बंध असून आपण पारंपारिक वाद्यावर भर द्यावा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही, गणेश विसर्जन मिरवणुका मध्ये गुलालाच्या वापरा ऐवजी फुलांचा वापर करावा.
तसेच ईद-ए-मिलाद निमित्त औसा शहरात मिरवणूक निघणार नसल्याने मुस्लिम समुदायाचे अभिनंदन केले. सदर बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले,पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड,सपोनी नाना लिंगे ,सपोनी प्रशांत लोंढे ,सपोनी राहुलकुमार भोळ ,एमएसईबी विभागाचे अभियंता काळे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाधव ,व नगरपरिषद चे नगरपरिषद चे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे ,औसा शहरातील प्रतिष्टित व्यक्ती सुभाष आप्पा मुक्ता , शकील शेख , अफसर शेख ,पवन राचट्टे , प्रदीप मोरे , अंगद कांबळे तसेच इतर सन्माननीय लोक उपस्थित होते.

About The Author