संजय पाटील चिमेगावकर यांना राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार

संजय पाटील चिमेगावकर यांना राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वझर येथील माजी मुख्याध्यापक संजय वसंतराव पाटील चिमेगावकर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार मिळाल्यामुळे उदगीर येथील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविका संगीताताई नेत्रगावे पाटील, चंचलाताई हूगे, माधवराव पाटील, पंढरीनाथ कदम, अमोल बिरादार, गणपत पाटील, अनिल पाटील इत्यादी मान्यवरांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संजय पाटील यांचा गौरव केला.

याप्रसंगी बोलताना संगीताताई नेत्रगावे पाटील यांनी सांगितले की, जे जे म्हणून उल्लेखनीय कार्य करतात, समाज त्या गोष्टीची जाणीव ठेवून योग्य वेळी निश्चितपणे त्या कार्याचा गौरव करत असतो. याची पावती म्हणजे संजय वसंतराव पाटील चिमेगावकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणे होय. आज पर्यंत प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करून आपला दबदबा निर्माण करणारे संजय पाटील हे शिक्षण क्षेत्रातील एक धुरंधर व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. यासाठीच अशा पुरस्काराचे आणि सत्काराचे नियोजन केले जात असते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन चंचलाताई हूगे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!