तालस्पर्श संगीत समारोह सोहळा उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी लातूर मध्ये तालस्पर्श म्युझिक अकॅडमी, लातूर प्रस्तुत कै.पं.शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्या स्मरणार्थ संगीत समारोह सोहळा आयोजित करण्यात आला होता. अकॅडमी मधील सर्व चिमुकल्या व युवा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व बहारदार असे गायन व तबलावादनाचे सादरीकरण केले. यानंतर मुख्य कलावंत प्रसिद्ध युवा पखावज वादक श्री. आसारामजी साबळे यांनी ताल-सुलताल मध्ये अतिशय तडफदार वादन करून श्रोत्यांची मने जिंकली. प्रसिद्ध युवा शास्त्रीय गायक श्री. सौरभजी नाईक यांनी राग-“मिया मल्हार”व त्यानंतर अभंग वाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व त्यानंतर “अगा वैकुंठाच्या राया’ भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. या कलावंतांना हार्मोनियम संगत-श्री चैतन्य पांचाळ, तबला संगत-श्री तेजस धुमाळ, तानपुरा संगत-कु.ईश्वरी जोशी व मंजिरी संगत-श्री महेश पांचाळ यांनी केली.
या संगीत समारोह सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक मा.श्री विशाल भैया जाधव आणि उद्घाटक म्हणून मा.श्री शिवयोगी अनंत महाराज तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य प्रा.श्री अमरजी कडतने सर,गुरुवर्य प्रा.श्री शशिकांतजी देशमुख सर, मा.श्री रामलिंगअप्पा वडगावे,विनोदवीर श्री बालाजी सुळ, अकॅडमी चे संचालक मा.श्री विश्वनाथजी धुमाळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तालस्पर्श संगीत समारोह सोहळ्याचे उद्घाटन संपन्न झाले. सोहळाप्रसंगी प्रमुख अतिथी कलावंत म्हणून सुप्रसिद्ध युवा पखावज वादक श्री आसारामजी साबळे त्याचबरोबर सुप्रसिद्ध युवा शास्त्रीय गायक श्री सौरभजी नाईक उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालस्पर्श म्युझिक अकॅडमी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमी मधील सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच संपूर्ण तालस्पर्श परिवाराने अथक परिश्रम घेतले.