गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा लातूर शहरात शुभारंभ.
लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णय नुसार गौरी गणपती सनानिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांचे निर्देशानुसार लातूर तहसील अंतर्गत लातूर शहर मधील रास्त भाव दुकान नंबर ९४ अवंति नगर या ठिकाणी संपन्न झाला.
लातूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती प्रियंका आयरे यांचे व लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे आणि मनीषा मेने सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लातुर तसेच लातूरचे तहसीलदार गणेश सरोदे व नायब तहसीलदार पुरवठा कुलदीप देशमुख यांचे मार्फत व लोकाधिकार संघाचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे पदाधिकारी हंसराज जाधव, सादिक शेख, पाटील, शिंदे यांची उपस्थिती मध्ये शुभारंभ करण्यात आला.
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शिधापत्रिकाधारकांना मान्यवरांच्या हस्ते हे आनंदाचा शिधा असलेले किट वाटप करण्यात आले.
हा आनंदाचा शिधा लातूर जिल्ह्यामध्ये चार लक्ष चार हजार पाचशे कुटुंबांना मिळणार असून लातूर तालुक्यात नव्यांनव हजार तीनशे त्रियांशी कुटुंबांना मिळणार आहे.
कार्यक्रमास अवंती नगर, सोना नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.