चांगल्या संगतीमुळे चांगले विचार घडतात – डॉ. दीपिका भद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात, विशाखा समिती तथा महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनींचा समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा मोरे, प्रमुख अतिथी डॉक्टर दीपिका भद्रे, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कार्यक्रम प्रमुख नीता मोरे, विजया गोविंदवाड, करुणा गायकवाड हे उपस्थित होते. मुलींचे समुपदेशन करताना दिनचर्या, ऋतुचर्येचे पालन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. तो दररोज करायला हवा. वयोमानाप्रमाणे संप्रेरकामुळे नैसर्गिक बदल घडत असतात. त्याला सामोरे जायला हवे. शारीरिक, मानसिक, भावनिक विकास याबद्दल माहिती देत, गुड टच, बॅड टच असे विस्तृत मार्गदर्शन डॉक्टर दीपिका भद्रे यांनी केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर थोर व्यक्तींच्या आत्मचरित्राचे वाचन करा. स्वयंशिस्तीवर भर द्या. आई,वडील व गुरुजनांचा सन्मान करा,असे अध्यक्षीय समारोपात आशा मोरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे, प्रास्ताविक राही नाईकवाडे, स्वागत व परिचय त्रिशा सोनटक्के, वैयक्तिक गीत पूनम जाधव, आभार श्रुती पाटील, तर कल्याण मंत्र स्नेहल डिकळे यांनी सादर केले. कार्यक्रम प्रमुख नीता मोरे, विजया गोविंदवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अंकिता नळगिरकर, श्रावणी जगळपुरे , भक्ती फुलारी,वैभवी जाधव, संस्कृती सूर्यवंशी, वेदिका कलबुर्गे, तनुजा राठोड, प्रांजल पाटील,यांचे सहकार्य लाभले. तब्बल 200 विद्यार्थिनींनी या समुपदेशनाचा लाभ घेतला. मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले,कृष्णा मारावार यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.