उदगीर रोटरी क्लबचा आज पदग्रहण व शिक्षकांचा सत्कार सोहळा

उदगीर रोटरी क्लबचा आज पदग्रहण व शिक्षकांचा सत्कार सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या सन २०२३-२४ च्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी शिक्षक दिनानिमित्त क्लबच्या वतीने सात आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मावळते अध्यक्ष रामेश्वर निटूरे व सचिव व्यंकटराव कणसे यांनी केले आहे. या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. माधव पाटील उचेकर, प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे सन २५-२६ चे प्रांतपाल सुधीर लातूरे, डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहा. प्रांतपाल शशिकांत मोरलावार, रोटरॅक्ट क्लबचे डीआरआर रवी बक्कड आदी उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल सन २०२३ -२४ च्या अध्यक्षपदी मंगला विश्वनाथे यांची तर सचिवपदी सरस्वती चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीरच्या अध्यक्षपदी तेजस आंबेसंगे व सचिवपदी शशांत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

उदगीर रोटरी क्लबचा आज पदग्रहण व शिक्षकांचा सत्कार सोहळा

याप्रसंगी संपूर्ण संचालक मंडळाचीही निवड करण्यात आली. रोटरीच्या नुतन संचालकांमध्ये उपाध्यक्षपदी प्रशांत मांगुळकर, कोषाध्यक्षपदी ज्योती चौधरी, सहसचिवपदी डॉ. सुधीर जाधव, क्लब ट्रेनरपदी किशोर पंदीलवार आदींची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत मेंबरशीप डायरेक्टरपदी संतोष फुलारी,रोटरी फाऊंडेशन डायरेक्टरपदी विजयकुमार पारसेवार, क्लब प्रशासनपदी प्रा. अन्नपूर्णा मुस्तादर, सेवाप्रकल्प संचालकपदी डॉ. बाळासाहेब पाटील, अनिल मुळे व मिलींद मुक्कावार, पब्लिक इमेज डायरेक्टरपदी रविंद्र हसरगुंडे, इंटरनॅशनल सर्व्हिस डायरेक्टरपदी चंद्रकांत ममदापुरे, परिवर्तन स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टरपदी विशाल जैन, डीइआय डायरेक्टरपदी प्रमोद शेटकार, डायरेक्टर युथ सर्व्हिस म्हणून अँड. विक्रम संकाये, डिस्ट्रिक्ट एम्फसिस डायरेक्टरपदी डॉ. मोहन वाघमारे, आर. आय. एम्फसिस डायरेक्टरपदी प्रा. सुनिता चवळे,होकेशनल सर्विस डायरेक्टरपदी गजानन चिद्रेवार, लिटरसी डायरेक्टरपदी सुयश बिरादार, पर्यावरण विभाग डायरेक्टरपदी भागवत केंद्रे, स्पोर्ट्स प्रमोशन डायरेक्टरपदी आशिष अंबरखाने, सांस्कृतिक डायरेक्टरपदी बिपिन पाटील, आय टी मीडिया अँड वेबसाईटवर डायरेक्टरपदी विशाल तोंडचिरकर, पल्स पोलिओ डायरेक्टरपदी कीर्ती कांबळे, विन्स चेअरमनपदी डॉ. सुलोचना येरोळकर, महिला सशक्तीकरण प्रमुखपदी महानंदा सोनटक्के, बुलेटिन चेअरमनपदी अँड. मंगेश साबणे, लसीकरण विभाग प्रमुखपदी राजगोपाल मनियार, फेलोशिप डायरेक्टरपदी सुनीता मदनुरे, नागेश आंबेगावे, सार्जंट अॅट आर्मपदी विद्या पांढरे आदींची निवड झाली आहे. या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी रघुकुल मंगल कार्यालयात सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author