विद्यार्थ्यांनी पदवी व शिक्षणाचा उपयोग राष्ट्रहितासाठी करावे – ना संजय बनसोडे

विद्यार्थ्यांनी पदवी व शिक्षणाचा उपयोग राष्ट्रहितासाठी करावे - ना संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) : मातृभुमी महाविद्यालयात दिले जाणारे नौकरी आणि व्यवसायाभिमुख शिक्षण हि काळाची गरज आहे .पदवीधर विद्यार्थ्यांनी आपले सर्व ज्ञान व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण रित्या वापरात आणावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जानिवा जपत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा व पदव्यांचा उपयोग राष्ट्रहितासाठी करावा, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मातृभूमी महाविद्यालय द्वारा आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण मंडळाच्या सचिव उषा कुलकर्णी या होत्या . मंचावर ,स्वा.रा.ती.म. वि.चे सहाय्यक उपकुलसचिव दिलीप पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, प्र. प्राचार्य मनोज गुरुडे ,प्रा उस्ताद सय्यद विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वरी तेलंगे आदींची उपस्थित होती.

पुढे बोलतांना मंत्री बनसोडे म्हणाले की, उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे असेच काम मातृभूमी महाविद्यालयातून होत असून व्यवसाईक शिक्षण दिले जात आहे . केवळ १७ विद्यार्थ्यांवर चालू केलेले महाविद्यालयात आज 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही आभिमानाची गोष्ट आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट करणे गरजेचे असुन शिक्षणाचा उपयोग सामाजिक जानिवेसोबतच आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करावा . उदगीरचा चौफेर विकास होत असुन विद्यार्थी शिक्षकांनी विकासासंदर्भात सुचना व कल्पना सुचवाव्यात असेही म्हणाले.

स्वा.रा.ती.म.वि.चे सहाय्यक उपकुलसचिव दिलीप पाटील यांनी आजचे युग हे स्पर्धेचे युग असून निर्माण झालेल्या समस्या वर मात करावयाची असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनविणे आवश्यक आहे सामाजिक बांधिलकीचा वसा विद्यार्थ्यांनी पत्करावा, असे सांगितले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्या उषा कुलकर्णी यांनी स्वतः ची जागा नसतानाही भाड्याच्या जागेत सुरु असलेले या महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणारे बहुतांशी विद्यार्थी आज विविध पदावर नौकरी करीत असल्याचे सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अश्विनी देशमुख, प्रा .जाई शर्मा यांनी केले तर आभार प्राचार्य मनोज गुरुडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष जोशी प्रा. रणजित मोरे, प्रा. रेखा रणक्षेत्रे,प्रा. अन्वेष हिप्पळगावकर, उषा सताळकर, ओंकारे जगदीशा , कांचन कडपत्रे, संतोष जोशी, दयानंद टाके, विवेक देवर्षे, संतोष वाघमारे यांनी प्रयत्न केले. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थी, पालक तसेच मातृभूमी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author