गोपाळ जोशी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

गोपाळ जोशी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

उदगीर/ प्रतिनिधी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथील माजी संगीत शिक्षक गोपाळराव जोशी यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लब उदगीर सेंट्रल यांच्यातर्फे सेवानिवृत्तीनंतर त्यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गोपाळ जोशी व ओमकार संगीत विद्यालयाच्या संचालिका त्यांच्या पत्नी सौ. छाया जोशी यांचा डॉ. माधव पाटील उच्चेकर, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल सुधीर लातूरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सेवा गौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी, रोटरेक्ट क्लब ऑफ उदगीरचे अध्यक्ष तेजस आंबेसंगे, सचिव शशांक चौधरी, माजी सचिव व्ही. एस कणसे, रवी बक्कड, विशाल तोंडचिरकर, विक्रम हलकीकर,मोतीलाल डोईजोडे, श्रीपाद श्रीमंतकर यांची यावेळी उपस्थिती होती. गोपाळ जोशी यांना सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

About The Author

error: Content is protected !!