उदगीर व जळकोट तालुक्यातील शेकडो गावांमध्ये मूलभूत सुविधा अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

उदगीर व जळकोट तालुक्यातील शेकडो गावांमध्ये मूलभूत सुविधा अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर – जळकोट मतदार संघातील शेकडो गावांमध्ये विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी या मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून मतदार संघाचा चौफेर विकास केला आहे. उदगीर मतदार संघाच्या विकासाची चर्चा संबंध महाराष्ट्रात होत आहे.
मतदार संघाचा भौतिक विकास करताना ग्रामीण भागातील जनतेला केंद्रबिंदू समजून प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे अथक परिश्रम घेत आहेत.
गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नामदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघातील गावांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून उदगीर व जळकोट तालुक्यातील गावांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.मतदार संघातील उदगीर तालुक्यातील सुकणी,वाढवणा बु., टाकळी, आडोळवाडी, मोर्तळवाडी, वंजारवाडी, खेर्डा, नळगीर, डाऊळ, इस्मालपूर , कोदळी, लोहारा, हिप्परगा, शिरोळ जानापुर, देऊळवाडी, बोरगाव बु., गुडसूर, एकुर्का, कुमदाळ, अवलकोंडा, बामणी, बेलसकरर्गा, भाकसखेडा पश्चिम, चांदेगाव, डोंगरशेळकी, धडकनाळ, धोंडीहिप्परगा, गंगापूर, गुरधाळ, हंगरगा कु., हंडरगुळी, हाळी, हेर,होनिहिप्परगा, करखेली करडखेल, करवंदी, कासराळ, कुमठा खु., कौळखेड, क्षेत्रफळ, लिंबगाव, लोणी, मांजरी, मादलापूर, माळेवाडी, निडेबन, पिंपरी शेल्हाळ, सोमठाणा, तादलापूर, वाघदरी, वाढवणा खु., येणकी, बनशेळकी, चिमाचीवाडी, चोंडी, देवर्जन, डिग्रस , गणेशवाडी (डिग्रस), हैबतपुर, मलकापूर , मलकापूर (शिवनगर), मोघा, नागलगाव, नावंदी, नेत्रगाव, रावणगाव , सताळा, कल्लूर,दावणगाव, शंभूउमरगा, शेकापूर , सोमनाथपूर, तोंडचिर, तोगरी आदी गावांमध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे तर जळकोट तालुक्यातील करंजी, मंगरूळ, धनगरवाडी (सोनवळा) जगळपूर, धामणगाव, जिरगा, विराळ, चेरा, वांजरवाडा, चिंचोली, उमरगा रेतू , कुणकी, हळद वाढवणा, पाटोदा बु., सोनवळा, डोंगरकोनाळी, मंगरूळ, बेळसांगवी, लाळी खु., लाळी बु., बोरगाव, घोणसी, कोळनुर , तिरुका, पाटोदा खु., माळहिप्परगा, रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, डोमगाव, वडगाव शेलदरा होकर्णा, उमरदरा, केकतसिंदगी, धामणगाव, येलदरा या गावामध्ये मूलभूत सुविधा योजनेतुन निधी मंजूर करण्यात आला आहे.
यानिधीतुन सभागृह बांधकाम करणे , सी.सी.रोड, पेव्हर ब्लॉक करणे, महापुरुषांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, रस्ता ,नाली, उद्याने सुशोभीकरण करणे, आदी कामांसाठी हा निधी वापरण्यात येणार असून आता ग्रामीण भाग ही लखलखीत होणार आहे. येत्या काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याने व प्रत्येक गाव व वार्डातील समस्या निवारण होत असल्याने ना. संजय बनसोडे यांचे ग्रामीण भागातील जनतेने आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

error: Content is protected !!