डॉ राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात महिला दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे, प्रफुलता बोडके, प्रतिभा सोमवंशी, सुनिता शिंदे, वर्षा बिरादार, मनोरमा तेलंगे, आम्रपाली सोमवंशी, संतोष खरोबे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. महिला दिनानिमित्त शाळेतील सर्व महिला शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्ञानोबा कुंडगिरे, प्रफुल्लता बोडके, प्रतिभा सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप वर्षा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बिराजदार यांनी केले तर आभार प्रशांत पांचाळ यांनी मानले.
