जागतिक महिला दिनानिमित्तमोफत रोग निदान व औषधोपचार शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील गुडसूर येथे जागतिक महिला दिना निमित्त उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल तर्फे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रमुख पाहुणे सरपंच उत्तम सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी देमगुंडे, माजी सरपंच विठ्ठलराव मरलापल्ले, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांच्या उपस्थितीत मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिर घेण्यात आले.
शिबिरात कॉलेजचे प्रा. डॉ. रवी पाटील, प्रा. डॉ. ऊषा काळे, प्रा. डॉ. रश्मी चिद्रे,प्रा. डॉ. शिवकांता चेटलुरे
इत्यादी तज्ञ डॉक्टरांनी 150 रुग्णांची
तपासणी करून रोग निदान व औषधोपचार केले.
जागतिक महिला दिनानिमित्त याच कार्यक्रमात गावकऱ्यांतर्फे
प्रख्यात सेवाभावी प्रा. डॉ. उषाताई काळे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी ऋतुजा जाधव, पंकज पोले, शंकर तोगरगे, कावेरी पवार,नर्स मुंडे ताई, सेंद्रिय शेतीनिष्ठ शेतकरी मेघराज मूडपे, बालाजी मूडपे,रोहिणी वलसे ,नंदिनी वलसे, जयश्री मूडपे, अदिती मुडपे, सुभाष सूर्यवंशी व सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
